Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार ग्रामीण भागातील युवकांना दिशा देणारी दुधेबावीची व्याख्यानमाला प्रेरणादायी – न्यायमूर्ती अनिल पानसरे विमानतळ परिसरात दुचाकीस्वारांची स्टंटबाजी; नागरिकांचा जीव धोक्यात, फलटण पोलिस कारवाई करणार का? जिल्हा बँकेच्या निकालाने राजे गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली : अशोकराव जाधव दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ अर्ज दाखल

टीम : धैर्य टाईम्स
17 applications filed in District Bank's five year election
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १७ उमेदवारांनी विविध मतदारसंघातून आपले २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांशी अर्ज 'प्राथमिक कृषी पतपुरवठा' आणि 'महिला राखीव'मधून दाखल झाले आहेत.

सातारा : जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १७ उमेदवारांनी विविध मतदारसंघातून आपले २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांशी अर्ज 'प्राथमिक कृषी पतपुरवठा' आणि 'महिला राखीव'मधून दाखल झाले आहेत.
'खटाव'मधून प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे आणि जावळी'तून ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज दाखल केला आहे, तर जि. प.चे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी 'कोरेगाव' तर मनोज पोळ यांनी 'माण'मधून अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असून याचदिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होणार आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी चौथा दिवस होता. त्यामुळे यादिवशी तरी प्रमुख उमेदवार आणि राजकीय नेतेमंडळी अर्ज दाखल करतील, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. आता तर अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व दिग्गज नेते सोमवारीच अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व इच्छुक नेते सोमवार, दि. २५ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत.
शुक्रवारी अर्ज कोण कोण दाखल करणार, याची उत्सुकता अनेकांना होती. मात्र, प्रमुख इच्छुकांपैकी कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. 'जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा'तून ज्ञानदेव किसन रांजणे यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. 'कोरेगाव प्राथमिक कृषी पतपुरवठा'तून शिवाजीराव महाडिक यांचे दोन अर्ज, 'खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा'तून प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. 'माण प्राथमिक कृषी पतपुरवठा'तून मनोजकुमार पोळ यांनी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा बँकेच्या 'महिला राखीव' गटात उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. येथून शुक्रवारी खटावच्या शशिकला जाधव-देशमुख यांनी दोन अर्ज तर जावळीच्या जयश्री वसंतराव मानकुमरे, पाटण येथील विश्रांती विजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, 'अनुसूचित जाती-जमाती' प्रवर्गातून मधूकर ज्ञानदेव भिसे, सुरेश बापू सावंत आणि 'इतर मागास प्रवर्गा'तून पांडुरंग बबन शिरवाडकर, 'विमुक्त जाती, भटक्या जमाती'तून तात्यासोा आबाजी धायगुडे, भागूजी विठ्ठल शेळके, जोतीराम बापूराव अवकीरकर यांनी अर्ज दाखल केले. 'नागरी बँका, नागरी पतपेढ्या'तून कोरेगावचे मनोहर वसंतराव बर्गे, सौरभ राजेंद्र शिंदे, मिलिंद तानाजी पाटील यांचे अर्ज आले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER