सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकलने अचानक पेट घेतला.
कराड : तासवडे टोल नाका येथे धावत्या मोटारसायकलने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. येथील एम.आय.डी.सी येथून कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जाताना सेवा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सागर तोडकर रा. आगाशीवनगर, ता. कराड असे मोटारसायकल चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकलने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर चालक सागर तोडकर यांनी तात्काळ मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला थांबवून सोडून दिली. परंतु, यामध्ये मोटारसायकल जाळून खाक झाली आहे.
दरम्यान, नागरिकांनी, तळबीड पोलीस ठाण्याच्या कर्मचारी व हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग यांनी आग विझवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.