Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सुमारे ५ हजार किलोमीटर लांब पल्याच्या व ३१ दिवस चालणाऱ्या देशातील पहिल्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचे रविवारी फलटण नगरीत आगमन होत आहे . सायकल वारीच्या स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज झाली आहे. 


भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यंदा रविवार दि. २ नोव्हेंबर ते बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ दरम्यान ३१ दिवसांची भव्य रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. वारीचे हे चौथे वर्ष असून ही वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यातून प्रवास करणार आहे. या वारीत १५० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली आहेत. देशातील ही पहिली अध्यात्मिक सायकल वारी असल्याचे भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी सांगितल.


कार्तिक शुद्ध एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा जन्मस्थान पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून सकाळी ६ वाजता रेल्वेलाईन , कराड नाका , पंढरपूर येथे रथयात्रा व सायकल वारीचा शुभारंभ भागवत धर्माची पताका फडकावून उपमुख्यमंत्री शिंदे हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यस्थान ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास , धर्मवीर अध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, आ अभिजीत पाटील, आ समाधान अवताडे, आ राजू खरे, माजी आ प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

सकाळी ८ वाजता वेळापूर येथे या सायकल वारीचे स्वागत माळशिरस विधानसभेचे आ उत्तमराव जानकर हे करणार आहेत तर दुपारी १२ वाजता सदाशिवनगर येथे सायकल वारीचे स्वागत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे करणार आहेत. नातेपुते , बरड मार्गे ही रथयात्रा व सायकल वारी पहिल्या फलटण मुक्कामी पोहोचेल . 

फलटण नगरीत स्वागत

संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व स्थानिक पंढरपूर-घुमान यात्रा संयोजन समिती च्या वतीने घुमान सायकलवारीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते श्री विठ्ठल मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे . फलटण मध्ये विधान परिषदेचे माजी सभापती, माजी खासदार , आमदार,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते,विविध संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर सायकल वारीचे स्वागत करणार आहेत . 


सायकल वारीचा समारोप

 महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्याचा दौरा करीत ही रथयात्रा व सायकल वारी मंगळवर दि. २५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचेल . परंपरेप्रमाणे श्री नामदेव दरबार कमिटी व घुमाण ग्रामस्थांच्या वतीने वारीचे स्वागत केले जाईल . बुधवार दि. २६ रोजी श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) येथे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ , धर्मवीर अध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल रायडर्सचा सन्मान व वारीचा समारोप करण्यात येणार आहे.


यावेळी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ॲड विलास काटे , सहसचिव राजेंद्रकृष्ण कापसे , खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्थ राजेंद्र मारणे, राज्य समन्वयक सरबजितसिंग बावा ( पंजाब) , गणेश उंडाळे ( महाराष्ट्र) , खेमराज नामा , सीताराम टाक (राजस्थान ) , मुलचंद परमार ( गुजरात ) , ॲड हरपालसिंग ( हरियाणा ) , महेंद्रसिंग लड्डा ( दिल्ली) , किशनसिंह राजपूत ( उत्तर प्रदेश) व अरुण नामदेव ( मध्यप्रदेश ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER