सातारा तालुक्यातील शिवथर गावच्या हद्दीत फरशीचा ओढा येथे झालेल्या डंपर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एक महिला ठार तर एक जखमी झाली. वंदना जालिंदर शेडगे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर गावच्या हद्दीत फरशीचा ओढा येथे झालेल्या डंपर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एक महिला ठार तर एक जखमी झाली. वंदना जालिंदर शेडगे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिवथर गावच्या हद्दीत अमोल सुभेदार मोरे (रा. रेवडी) यांच्या शेतात ऊसतोडणी करण्यासाठी वंदना जालिंदर शेडगे (वय ३८, रा. वैजुबाभळगाव) या ट्रॅक्टरमधून जात होत्या. यावेळी मागून येणाऱ्या डंपरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत वंदना गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर वंदना यांना उपचारासाठी तत्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची तक्रार वंदना यांची बहीण सुनीता योगेश शिंदे (वय ३0, रा. आष्टी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर डंपरचालक देवेंद्र कुमार वर्मा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करत आहेत.











