फलटण प्रतिनिधी :
भिवंडी जि. ठाणे येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण दलित समाज पेठून उठला आहे. कॉलेज मधील किरकोळ वादातून हे हत्याकांड झाले आहे. संकेत भोसले या युवकास अपहरण करीत गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना कडक शासन झाले पाहिजे व संकेत भोसले यास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विविध दलित समाज संघटनेकडून होत आहे. या अमानवी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण फलटण शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तरी या दिवशी फलटण शहरातून सकाळी 10 वाजता शांततापूर्ण मोर्चाने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ फलटण येथून निघणार आहे. तरी फलटण शहर व तालुक्यातील दलित बांधवांसह विविध सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होत मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.