फलटण येथील ज्ञानेश्वर तथा डी. के.पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मुंबई महानंद डेअरीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ येथे फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार उपाध्यक्ष दत्तात्रेय परशुराम रणवरे, फलटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार इंगळे दूध संघाचे जेष्ठ संचालक बबनराव निकम हनुमंतराव चव्हाण संघाचे व्यवस्थापक श्री तुकाराम नलावडे उपस्थित होते.
ज्ञानेश्वर तथा डिके पवार यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.