भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आपला विश्वास होता आणि एक दिवस फलटण मध्ये सर्वसामान्य घरातील व्यक्तीच राजांची सत्ता उलटून टाकेल हा विश्वास खासदार यांनी सार्थ केल्याचे ॲड. निकम यांनी निदर्शनात आणून दिले.
गुजरातने आपल्या राज्याच्या जाहिराती करता जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमले आहे मात्र फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची जाहिरात करण्याकरता रामराजे हे खासदारांचे फुकटचे ब्रँड अँबेसिडर झाल्याची खरमरीत टिका फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम यांनी केली. ते साखरवाडी येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण तालुका संपर्क दौऱ्याच्या वेळी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, बबलू मोमीन, माजी नगरसेवक जाकीर मणेर,विक्रम भोसले माजी सरपंच साखरवाडी, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, साखरवाडी सरपंच सौं. जाधव भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, साखरवाडी, जिंती, होळ, सस्तेवाडी. निंभोरे, खामगांव आदी भागातील आजी माजी पदाधिकारी उपास्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ॲड.निकम म्हणाले देशातील लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ हा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला होता मात्र नुकताच खा रणजितसिंह यांच्या माध्यमातून निरा - देवघर साठी 3976 कोटी तर 1200 कोटी पंढरपूर रेल्वेसाठी व त्या अगोदरही कोठ्यावधींचा निधी माढा लोकसभा मतदारसंघात आल्यामुळे आता माढा लोकसभा मतदान संघ हा खासदार रणजितसिंहाचा म्हणून ओळखला जाऊ लागला असल्याचे गौरउद्गार ॲड. निकम यांनी काढले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आपला विश्वास होता आणि एक दिवस फलटण मध्ये सर्वसामान्य घरातील व्यक्तीच राजांची सत्ता उलटून टाकेल हा विश्वास खासदार यांनी सार्थ केल्याचे निकम यांनी निदर्शनात आणून दिले.
लोकांच्या पोटात शिरून पोट फाडणारी ही औलाद असून ज्यांना कधी फोन आला नाही त्यांना आता यांचे फोन येतील त्यामुळे त्यांच्या फोनला भुलून जाऊ नका. 27 वर्ष फलटण तालुक्याला झुलवत ठेवणाऱ्या रामराजेनंमुळे हा तालुका तब्बल 54 वर्ष मागे गेल्याचा सणसणीत आरोप यावेळी ॲड.निकम यांनी केला.
फलटण शेजारील बारामती व इंदापूर तालुका शेती त्याचबरोबर औद्योगिकीकरणामध्ये विकासाचे रोड मॉडेल झाले आहे त्याच धर्तीवर फलटणचा सुद्धा विकास होणे गरजेचे आहे ते काम आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पूर्ण होईल असा विश्वास यावेळी ॲड.निकम यांनी व्यक्त केला.
राजकारणासाठी संसार मोडणारी फलटण तालुक्यातील वाईट पद्धत आता आपण बंद करत यापुढे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू व येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार देशात येणार असून माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदार रणजितसिंह यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवू. त्याचबरोबर सर्वाधिक मताधिक्य फलटण तालुक्यातून देण्यासाठी येऊ घातलेला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार न पाहता विरोधकांना आसमान दाखवू असे शेवटी ॲड. निकम आपल्या भाषणात म्हणाले.