पिंपरद ता. फलटण येथील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत मरीमाता ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. वैशाली नवनाथ भगत यांनी मतदारांच्या प्रतीक्षा गाठी भेटीवर भर देत प्रचारात आघाडी घेतली आहे. पिंपरद ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये प्रथमच भाजपच्या वतीने सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून संधी मिळालेल्या सौ वैशाली नवनाथ भगत यांनी पिंपरद मधील मतदारांच्या समस्या प्रत्यक्ष घरी जाऊन जाणून घेतल्या. बिरोबा वार्ड क्रमांक १ मधील मतदारांचा आशीर्वाद घेत सौ वैशाली भगत यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका पिंपरद गावच्या विकासाचे मुद्दे मतदारांना पटवून सांगितले.
बिरोबा वार्ड क्रमांक १ मधील मतदारांनी सरपंच पदाचे उमेदवार सौ.वैशाली नवनाथ भगत यांच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
या प्रचार फेरीत युवक वर्गासह महिला व वयोवृद्धांनी मोठा हिरहिरीने सहभाग घेतला.