माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण तालुक्याचा 3 दिवस दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली.
1 ते 3 मार्च दरम्यान फलटण तालुक्यातील जिल्हापरिषद गट निहाय हा दौरा करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रमुख गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकी तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न,कष्टकऱ्यांचा प्रश्न,कामगारांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, विध्यार्थ्यांचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, विजेचा प्रश्न, याचबरोबर फलटण तालुक्यातील येऊ घातलेल्या विकासात्मक मुद्यावर खासदार जनतेची संवाद साधणार आहेत.
1 मार्च दौरा पुढील प्रमाणे :- तरडगाव जिल्हापरिषद गटातील तरडगाव सकाळी 9 वाजता, पाडेगाव सकाळी 11 वाजता, तर 12 ते 4 ही राखीव वेळ असणार आहे. तर सायंकाळी 4 वाजता हिंगणगाव गटातील हिंगणगाव सायंकाळी 4 वाजता व बीबी सायंकाळी 5 वाजता तर साखरवाडी जिल्हापरिषद गटातील साखरवाडी सायंकाळी 6 वाजता दौरा होणार आहे.
दिनांक 2 मार्च विडणी जिल्हापरिषद गटातील सोमँथळी सकाळी 8 वाजता, राजाळे सकाळी 9 वाजता, गुणवरे जिल्हापरिषद गटातील गोखली 11 वाजता, मुंजवडी 12 वाजता,कोळकी जिल्हापरिषद गटातील कुरवली पाटी (बरड ) दुपारी 1 वाजता, भाडळी सायंकाळी 5 वाजता, गिरवी जिल्हापरिषद गटातील फरांदवाडी सायंकाळी 6 वाजता तर सायंकाळी 7 वाजता ढवळ या ठिकाणी दौऱ्याचे आयोजन असून दिनांक 3 मार्च रोजी गिरवी जिल्हापरिषद गटातील धुमाळवाडी सकाळी 8 वाजता निरगुडी सकाळी 9 वाजता, विंचूर्णी सकाळी 10 वाजता, दालवडी सकाळी 11 वाजता, उपळवे दुपारी 12 वाजता, ताथवडा दुपारी 3 वाजता मिऱ्यांचीवाडी सायंकाळी 4 वाजता तर विडणी जिल्हापरिषद गटातील विडणी येथे सायंकाळी 6 वाजता दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक राजेश शिंदे यंच्याशी संपर्क करावा.