पिंपरद येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेगट यांच्यावर विश्वास ठेवत ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा एकदा राजे गटाकडे दिल्याने खासदार गटाला मोठा शह मानला जात आहे.
पिंपरद (फलटण ) येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस, राजे गट पुरस्कृत सिद्धेश्वर पॅनलच्या सौ. स्वाती गणेश भगत यांची बहुमताने निवड झाली आहे. फलटण येथील शासकीय गोदाम या ठिकाणी आज मतमोजणी पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सिद्धेश्वर पॅनलच्या सौं. स्वाती गणेश भगत यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपा खासदार गटाच्या सौं. वैशाली नवनाथ भगत यांचा 364 मतांनी पराभव केला. सौ. स्वाती भगत यांना 1332 तर सौ. वैशाली भगत यांना 968 मते मिळाली. अपक्ष उमेदवार सौ.राजश्री सुनील कापसे यांना 112 तर चेतना आडके यांना 41 मते मिळाली.
गत पंचवार्षिक निवडणुकीत पिंपरद ग्रामपंचायत वर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाने विजय प्राप्त केला होता, मात्र तत्कालीन सरपंच कै. विजय घनवट यांच्या आकस्मित मृत्यूनंतर सत्ता बदल होत गेली दोन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राजे गटाने सत्ता स्थापन करत खासदार गटाला शह दिला होता.
पिंपरद येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेगट यांच्यावर विश्वास ठेवत ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा एकदा राजेगटाकडे दिल्याने खासदार गटाला मोठा शह मानला जात आहे.