फलटण : प्रतिनिधी
ऐतिहासिक फलटण संस्थानचे अधिपती, महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथील माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने मंगळवार पेठ, फलटण येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, पांडुरंग गुंजवटे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा सनी अहिवळे, योगेश शिंदे, हरीशआप्पा काकडे,पत्रकार शक्ती भोसले, शिवा अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात उपयोगी असणारी स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, पेन्सिल बॉक्स, चित्रकला वही, कलर बॉक्स अशा विविध वस्तू वाटप केल्याचे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी सांगितले. शाळेत जाण्यापूर्वीच शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
लहान मुलांच्या स्कूल बॅग, वॉटर बॅग, गणवेश आदींच्या दरातही वाढ झाली आहे. मोठ्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चापेक्षा लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च जास्त आहे.
शंभर पानी साधी वही : 25 ते 30 रुपये प्रतिनग
दोनशे पाणी साधी वही : 35 ते 40 रुपये प्रतिनग
क्वायर बुक 100 पानी : 40 ते 45 रुपये
क्वायर बुक 200 पानी : 80 ते 85 रुपये
साधे पेन : 5 रुपयांवरून आता 7 रुपये झाले असल्यामुळे शिक्षण आता महाग झाले आहे. त्यामुळे सनी अहिवळे यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक सनी अहिवळे मित्र परिवार व सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.