फलटण प्रतिनिधी -
महाशिवरात्रीनिमित्त नाईकबोमवाडी (ता. फलटण) येथील शिवजल सिटीतील शिवजल मंदिर बुधवारपासून (ता. २६) सर्वांसाठी खुले होणार आहे. बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत शिवजल ऊर्जा कलश पूजन नाशिक येथील यज्ञाचार्य वेदोपासक श्री भूषण शुक्ल गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान महायज्ञ, शिवअभिषेक,स्रोत, मंत्र, पूजा पठण करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत अघोरी तांडव होणार आहे. रात्री आठ ते नऊ भूपेंद्र सिंग राठोड यांचे शिवजल ऊर्जा ध्यान होईल. रात्री नऊ ते दहा यावेळेत शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांचे शिवजल ऊर्जा ध्यान आहे. रात्री १२ ते १ यावेळेत शिवजल स्वामी महायज्ञ होईल. शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.