फलटण :
2009 साली फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे पुनर्रचनेनंतर अनुसूचित जाती करता हा मतदार संघ राखीव झाला. 2009,2014 व 2019 या तीन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या वेळी आंबेडकरी समाजाचा आमदार झाला नाही. येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी समाजाचा आमदार व्हावा याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. त्याच अनुषंगाने आज फलटण येथे माजी नगरसेवक यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थित यावर निर्णय घेण्यासाठी उद्या दिनांक 13 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करावेत असे कळविण्यात आले आहे.