फलटण प्रतिनिधी — माढा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दाखल केला.महायुतीतर्फे भाजपच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह यांना पुन्हा संधी देण्यात आली. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माढाचे आमदार बबनराव शिंदे ,करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माण चे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघाचा उर्वरित विकास करण्यासाठी भाजपने आपणास संधी दिली आहे. तर महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी त्यास पाठिंबा दिला आहे. अजूनही आपणासमोर सामर्थ्यवान उमेदवार नसल्याचे सांगत 19 तारखेपर्यंत सामर्थ्यवान उमेदवार आला नाही तर आपली निवडणूक एकतर्फी होणार असल्याचा विश्वास यावेळी खासदार रणजितसिंह यांनी बोलून दाखविला. उत्तम जानकर यांनी महायुतीच्या बरोबर राहण्याचे सांगितले असून 19 तारखेला त्यांच्या निर्णयानंतर कळेलच अशी प्रतिक्रिया शेवटी खासदार रणजितसिंह यांनी दिली.
आज सोलापूर येथे प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात केले.