फलटण प्रतिनिधी -
फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बापूराव गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन शनिवार दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता तुळजाभवानी मंदिर, खटकेवस्ती येथे करण्यात आले आहे. यावेळी विधान परिषदेचे मा. सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती असणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण असणार आहेत.
फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी बापूराव गावडे यांची निवड झालेबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर,श्रीराम कारखान्याचे मा.चेअरमन महादेव पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
https://dhairyatimess.com/upload/post/9216ca9f8f.jpg