फलटण प्रतिनिधी - "तुमचे काय" असा थेट प्रश्न खा.शरद पवार यांनी फलटण येथील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदू मोरे यांना उमेदवारी विषयी विचारणा केल्याचा विषय ताजा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नंदू मोरे यांनी "तुम्हीच" असा सूचक इशारा केला. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नंदू मोरे यांची सांगली येथे भेट झाली त्यावेळी जयंत पाटील व निष्ठावंत कार्यकर्ते नंदू मोरे यांच्यात विधानसभा निवडणुकी संबंधी चर्चा झाली. यावेळी मा. खा. कुमार केतकर, श्रीमती पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला प्रतिनिधी करण्याची संधी मिळावी याकरीता संविधान समर्थन समिती, फलटणच्या वतीने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो खा. शरद पवार यांची भेट घेण्यात आली होती त्यावेळी तुमचे काय असा थेट प्रश्न खा.पवार यांनी फलटण येथील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदू मोरे यांना विचारला. त्यावर मोरे यांनी आपला निर्णय अंतिम असेल असे उत्तर दिले होते. त्यानंतर आज जयंत पाटील आणि नंदू मोरे यांची सांगली येथे भेट झाली. या भेटीवेळी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व विविध विषयावर चर्चा झाली.
येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत नंदू मोरे यांना मोठी पक्षीय जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर नंदू मोरे हे आज पक्षीय बैठकीसाठी सांगली येथे गेले होते.