फलटण प्रतिनीधी: -
येथील धनगर समाजातील युवा नेतृत्व व फलटणच्या माजी उपनगराध्यक्ष सुलोचना दौलतराव चोरमले यांचे चिरंजीव युवा उद्योजक संदीप चोरमले यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. संदीप चोरमले यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फलटण मध्ये खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी जाहीर केली असून त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेक पक्ष प्रवेश सुरू असून आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्याचे दौऱ्यावर असताना व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत फलटण नगर परिषद उपनगराध्यक्ष सुलोचना दौलतराव चोरमले यांचे चिरंजीव युवा उद्योजक संदीप चोरमले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
माढा लोकसभा मतदारसंघात खासकरून फलटण कोरेगाव विधानसभा मतदासंघात धनगर समाजाचे मतदान मोठया संख्येने आहे. युवा उद्योजक संदीप चोरमले हे धनगर समाजाचे युवा नेतृत्व असून त्यांचा फायदा निश्चितच भारतीय जनता पक्षास होणार आहे. सामाजिक कामात आग्रेसर असणाऱ्या संदीप चोरमले यांचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा भारतीय जनता पक्षास होणार आहे.
यापुढे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढे सामाजिक व राजकीय वाटचाल करणार असून फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे स्वप्न बाळगणारे व ते सत्यता उतरवणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाची प्रचंड मोठी ताकद उभी करणार असल्याचे यावेळी संदीप चोरमले बोलून दाखवले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, माजी नगरसेवक अशोकराव जाधव,राजाभाऊ नागटिळे,भाजप अल्पसंख्याक आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सागर शहा, अभिजित नाईक निंबाळकर,निलेश खानविलकर, जकिरभाई मणेर व निलेश चिंचकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.