Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश

रामराजेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला - ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील

टीम : धैर्य टाईम्स

फलटण तालुक्यामध्ये कै. श्रीमंत शिवाजीराजे, कै.कृष्णचंद्र भोईटे,कै. चिमणराव कदम यांनीही तालुक्याचे नेतृत्व केले मात्र रामराजेंनी राजकीय जीवनाबरोबरच खाजगी जीवन उद्ध्वस्त करण्याचे खालच्या पातळीवरचा राजकारण केलेचे सांगत रामराजेंनी केलेल्या कट कारस्थानाचा आपण त्यांना धडा शिकवू असा विश्वास यावेळी साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला

फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना मी चालवत असताना जाणीवपूर्वक कारखान्याला अडथळा आणत राजकीय सूडबुद्धीने माझ्या भोळेपणाचा फायदा घेत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा सणसणीत आरोप ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके - पाटील यांनी केला ते साखरवाडी येथे झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण तालुका संपर्क दौऱ्या दरम्यान बोलत होते.

यावेळी  माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, ॲड.नरसिंह निकम, सुशांत निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, बबलू मोमीन, माजी नगरसेवक जाकीर मणेर,विक्रम भोसले माजी सरपंच साखरवाडी, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, साखरवाडी सरपंच सौं. जाधव भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, साखरवाडी, जिंती, होळ, सस्तेवाडी. निंभोरे, खामगांव आदी भागातील आजी माजी पदाधिकारी उपास्थित होते.

 यावेळी पुढे बोलताना ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील म्हणाले, मी व त्याचबरोबर माझे ज्येष्ठ चिरंजीव धनंजयदादा यांच्याकडून कारखान्याविषयी माहिती घेत माझ्यावर राजकीय सूड बुद्धीतून षडयंत्र रचत कारखान्याला अडचणीत आणण्याचा राजकारणातील किळसवाना प्रकार रामराजे यांनी केल्याचे यावेळी साळुंखे -  पाटील यांनी निदर्शनात आणून दिले.

 यापूर्वी फलटण तालुक्यामध्ये कै. श्रीमंत शिवाजीराजे, कै.कृष्णचंद्र भोईटे, कै. चिमणराव कदम यांनीही तालुक्याच्या नेतृत्व केले मात्र रामराजेंनी राजकीय जीवनाबरोबरच खाजगी जीवन उद्ध्वस्त करण्याचे खालच्या पातळीवरचे राजकारण केलेचे सांगत रामराजेंनी केलेल्या कट कारस्थानाचा आपण त्यांना धडा शिकवू असा विश्वास यावेळी साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

 श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी फलटण शहरातून व्यापाऱ्यांकडून तब्बल 10 ते 12 कोटी रुपये रामराजे यांनी जमा केले होते त्या पैशाचे पुढे काय झाले असा सवाल उपस्थित करून श्रीराम चा जवाहर कारखान्याबरोबर केलेला नवीन करारामुळे या कारखान्याचे खाजगीकरण झाल्याचे साळुंके- पाटील यांनी निदर्शनात आणून दिले.

 श्रीराम सहकारी साखर कारखान्यासह तालुका दूध पुरवठा संघ,मार्केट कमिटी यासह फलटण तालुक्यातील सहकार चळवळ रामराजे यांनी मोडीत काढल्याचा आरोप यावेळी प्रल्हादराव साळुंखे - पाटील यांनी केला.

 खासदार रणजितसिंह नाईक निंबाकर यांच्या संपर्क दौऱ्या ऐवजी याला आपण राजकारणाच्या परिवर्तनाला मेळावा असे संबोधून फलटण तालुक्याचे राजकीय परिवर्तन करू असे सांगत फलटण तालुक्याच्या राजकारणाला साखरवाडी दिशा देण्याचे काम करत असते आजची साखरवाडीतील सभा म्हणजे बदलत्या राजकीय परिवर्तनावर शिक्का मोर्तब झाल्याचे साळुंखे - पाटील यांनी सांगितले.

 आपल्यावर कटकारस्थान करत राजकीय व वैयक्तिक जीवन संपवण्यासाठी सूडबुद्धीने राजकारण करणारे रामराजे यांना धडा शिकवत पाटील काय चीज आहे हे दाखवून देईल असा विश्वास शेवटी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार रामराजे एका कार्यक्रम प्रसंगी आपणास नुकतेच भेटले होते. त्यावेळी खासदार रणजितसिंह आपल्या पेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करू नका असा सल्ला त्यांना दिला असून आपलले आता वय झाले आहे आपण दोघेही एकत्रच राजकीय संन्यासाची पत्रकार परिषद घेऊ असा सल्ला दिल्याचे प्रल्हादराव साळुंखे - पाटील यांनी सांगितले.

 खासदार रणजितसिंह दादांच्या बरोबर आपण माझे सुपुत्र धनंजयदादांना राजकारणासाठी पूर्ण वेळ दिले असून योग्य ठिकाणी आपण मार्गदर्शन करू असे प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER