सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती तर हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत.
देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी रात्री उशीरा नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सी.पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत.
ते पूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. तर महाराष्ट्रातील हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यानुसार हे असतील नवनियुक्त राज्यपाल
हरिभाऊ किसनराव बागडे राजस्थानचे राज्यपाल, विष्णू देव वर्मा तेलंगणाचे राज्यपाल, ओम प्रकाश माथुर, सिक्कीमचे राज्यपाल, संतोष कुमार गंगवार, झारखंडचे राज्यपाल, रामेन डेका, छत्तीसगडचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर, मेघालयचे राज्यपाल, सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल
गुलाबचंद कटारिया, पंजाबचे राज्यपाल (अतिरिक्त जबाबदारी प्रशासक चंडीगड केंद्रशासित प्रदेश, लक्ष्मण प्रसाद आसाम राज्यपाल ( अतिरिक्त कार्यभार मणिपूर राज्यपाल)
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन कोण आहेत?
सी. पी. राधाकृष्णन हे कोइम्बतुर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तामिळनाडू राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कामा पाहिले असून ते भाजपचे जुने सदस्य आहेत.