Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

वैद्यकीय शिक्षणाची पदवी प्राप्त केल्यानंतर ग्रामीण भागात सेवा देणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य ; महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील

टीम : धैर्य टाईम्स

कृष्णा आणि प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना एकाचवेळी झाली. आमच्या वडिलांनी आणि आप्पासाहेबांनी केलेल्या या सामाजिक कार्याचा व ज्ञानदानाचा हा वारसा आम्ही अविरतपणे जोपासत आहोत. डॉ. अतुल भोसले हे उद्याचे भविष्य असून, त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे प्रतिपादन ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केले. 

कराड, ता. १० : लोकांना तंत्रज्ञान सहज उपलब्ध झाल्याने लोक जागरुक झाले आहेत. अशावेळी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत, विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करताना आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले पाहिजे. वैद्यकीय शिक्षणाची पदवी प्राप्त केल्यानंतर ग्रामीण भागात सेवा देणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असून, सामाजिक दृष्टिकोन बाळगून काम करा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.

कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. पोलिस दलाच्या विशेष बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर इजिप्शियन सिनेटच्या सदस्य व मर्क फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राशा केलेज, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, दिलीप पाटील, डॉ. दिपक टेम्पे, डॉ. सबिता राम, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, संशोधन संचालक डॉ. प्रमोद जॉन, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅाडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इजिप्शियन सिनेटच्या सदस्य व मर्क फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राशा केलेज यांना, आरोग्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल विद्यापीठातर्फे ‘डी.लिट’ सन्मान प्रदान करण्यात आला.

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या ११ व्या दिक्षांत सोहळ्यात इजिप्शियन सिनेटच्या सदस्य डॉ. राशा केलेज यांना ‘डी. लिट’ प्रदान करताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. नीलम मिश्रा, विनायक भोसले व अन्य मान्यवर.

याप्रसंगी बोलताना ना. विखे-पाटील म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांनी दूरदृष्टी ठेऊन ‘कृष्णा’च्या रुपाने लावलेल्या रोपट्याचा आज डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने मोठे काम केले असून, ते कौतुकास्पद आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाबरोबर काळानुरूप बदल करण्याची गरज असून, संशोधनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्र हे समाजसेवेचे, मानवतेचे आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा विश्व विद्यापीठ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संशोधन, नवनिर्मितीला चालना देणारे ज्ञानकेंद्र आहे. विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याचे कार्य करतानाच, तळागाळातील समाजापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचे आणि आरोग्याबाबत लोकजागृती करण्यावे काम कृष्णा विश्व विद्यापीठ करत आहे. कृष्णा हॉस्पिटलने कोविड काळात ९००० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. शिरवळ येथे लवकरच विद्यापीठाचा नवीन कॅम्पस विकसित करण्यात येणार आहे. 

‘डी.लिट’प्राप्त डॉ. राशा केलेज म्हणाल्या, कृष्णा विश्व विद्यापीठ ‘क्लास वन’ विद्यापीठ असून, त्यांनी मला डी.लिट पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आमच्या फौंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ५० देशांतील शेकडो विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात आली असून, या कामात मला माझ्या कुटुंबीयांसह समाजाचेही मोठे सहकार्य लाभले आहे.

सोहळ्याला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञान विभागप्रमुख डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. जी. वरदराजूलु, नर्सिंग विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे विभागप्रमुख डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. आर. सी. डोईजड, अधिष्ठाता डॉ. सौ. सुप्रिया पाटील, डॉ. सौ. रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. स्नेहल मसूरकर, डॉ. अक्षदा कोपर्डे, डॉ. स्वप्ना शेडगे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER