Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

यात्रा घोटाळा व मालवाहतूक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार करणार : नानासो उर्फ पिंटू इवरे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण एसटी आगारात अष्टविनायक यात्रा व मारुती यात्रा, मालवाहतूक भाडे यामध्ये जो आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे असाच भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात झाला असल्याची शक्यता असल्याची बाब शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी बोलून दाखवली

फलटण प्रतिनीधी:- फलटण एसटी आगारा बाबतच्या तक्रारीचा सासेमिरा पाठ सोडण्याचे चिन्ह दिसत नसून यात्रा घोटाळा व मालवाहतूक घोटाळा प्रकरणी शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी याप्रकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी फलटण एसटी आगारा बाबतच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे. यावेळी बोलताना नानासो उर्फ पिंटू इवरे म्हणाले की, शनिवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील अनेक गावातील महिलां व पुरुष अष्टविनायक यात्रेसाठी गेल्या असता एसटी महामंडळ भरारी पथकाने रांजणगाव येथे केलेल्या गाडी तपासणीत चार गाड्यांमध्ये सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा घोटाळा झाला असून वासंती जगदाळे आगार व्यवस्थापक , राजेंद्र वाडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक, रोहित नाईक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक , सुहास कोरडे वाहतूक निरीक्षक, सुखदेव भीमराव अहिवळे सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सुरजित बोबडे लिपिक हे सर्व अधिकारी व कर्मचारी यास जबाबदार आहेत.

फलटण तालुक्यातील महिलांनी अष्टविनायक यात्रेच्या चार गाड्याचे पैसे राजेंद्र वाडेकर यांनी प्रवाशांकडून ऑनलाईनद्वारे स्वतःच्या खात्यावर पैसे मागून घेतले परंतु बुकिंग तिकीटे महिलांना दिली नाहीत व एसटी खात्यावर पैसे भरले नाहीत फक्त एका कागदावर सही शिक्का मारून दिले, वासंती जगदाळे आगार व्यवस्थापक यांनी परवानगी दिली यात्रेसाठी लागणाऱ्या चार गाड्या एसटी नियमांनुसार कागदपत्र न करता राजेंद्र वाडेकर यांनी साध्या कागदावर आगार प्रमुख यांचा शिक्का मारून स्वतःच सही करून दिली यात सहभागी रोहित नाईक यांनी चार गाड्या दिल्या आहेत.

सुहास कोरडे वाहतूक निरीक्षक यांनी चार एसटी साठी चालक व वाहक यांना काम नेमून दिले. रांजणगाव येथे रात्री एसटी भरारी पथकाने या चार गाड्या थांबवून या गाड्यांची तपासणी केली गाडीतील प्रवाशांनी राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांनी बुकिंग तिकीटे अथवा पत्र दिले नसल्याचे सांगितले. अंदाजे १ लाख ५० हजार रुपये एस टी महामंडळाच्या खात्यावर न भरता घोटाळा करत सर्व अधिकाऱ्यांनी मिळून राजेंद्र वाडेकर याच्या खात्यावर ऑनलाईन ने मागवून घेतले आहेत. 

खटकेवस्ती, घाडगेवाडी, साखरवाडी येथील महिलांची लाखो रुपयांची फसवणूक सर्व अधिकाऱ्यांनी मिळून केली आहे. तसेच ११ मारुती दर्शन मध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे यात पण महिलांना कच्या चिठ्ठीवर तिकिटे देवून फुल तिकिट देवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोरोनात पण माल वाहतुकीत याच वाडेकर च्या खातेवर पैसे जमा करुन घेत कंपनी, साखर कारखाने, पशुखादय, वाहतुकी यात खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे याची पण चौकशी होणे गरजेचे आहे. याच राजेंद्र वाडेकरनने मागील काही महिन्यात असाच भ्रष्टाचार केला होता.

त्याच वेळेस यास निलंबित का केला नाही, यातील पैसे कोणत्या आधारे भरुन घेतले व कोणते अधिकारी यास पाठीशी घालत आहेत. फलटण आगारातील कर्मचारी व ड्रायव्हर, कन्डक्टर दहशतीखाली काम करत आहेत. त्यांची मानसिक व शारीरिक पिळवणुक होत आहे. तसेच प्रवाशांना मारहाण वेळेत बस न सुटणे, चौकशी करणाऱ्या प्रवाशांशी हुज्जत घालणे, अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वाहक व वाहन चालक यांना लिपिक व स्टोअर किपर सारख्या ठिकाणी ड्युटी देणेचे उदयोग पण चालू आहेत, तसेच विद्यार्थीची गैरसोय होईल अशा पध्दतीने बसेस सोडणे व खोटे गुन्हे दाखल करणेच्या धमक्या देणे असे प्रकार फलटण बस स्थानकात सऱ्हास चालू आहेत.

एसटी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना पालकमंत्री ना.शंभुराजे देसाई साहेब व जिल्हाअधिकारी यानी सुचना करुन फलटण डेपो बाबत लक्ष घालण्याच्या सुचना केल्या होत्या मी स्वत:अनेक तक्रारी बाबत भेट घेऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. सदर प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार करणार आहे असे सांगितले.

वासंती जगदाळे आगार व्यवस्थापक,राजेंद्र वाडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक, रोहित नाईक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सुहास कोरडे वाहतूक निरीक्षक सुखदेव भीमराव अहिवळे सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सुरजित बोबडे लिपिक हे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मारुती यात्रा, अष्टविनायक यात्रा, माल वाहतूक भाडे यामध्ये मोठा घोटाळा केला आहे याचा तपास करून वरील सर्वांना तत्काळ अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी केली आहे. यावेळी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पवार,जेष्ठ नेते संजय अहिवळे, शहर उपप्रमुख विनोद एक्के, समीर गायकवाड उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER