Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटणमधील सोने-चांदी व्यापार्‍याचे रिंगरोडवरील रस्त्यावर अतिक्रमण

पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा
टीम : धैर्य टाईम्स
संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्‍वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत  असल्याची चर्चा फलटणकर नागरिकांमधून होत आहे. या अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

युवराज पवार

फलटण : संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्‍वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत  असल्याची चर्चा फलटणकर नागरिकांमधून होत आहे. या अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी धडाकेबाज कारवाई करीत शहरातील अनेक अतिक्रमणे हटवली. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सिंघम, मुंडे अशी पदवी बहाल केली. मात्र, ही अतिक्रमण हटाव मोहीम कोविडच्या पार्श्‍वभूमीवर थंडावली. मात्र, रिंगरोडचे अतिक्रमण हटवून फलटण शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी सत्ताधारी राजेगटाने व मुख्याधिकारी प्रसाद काटकर व इतर पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरासह गल्लीबोळातून अतिक्रमणे हटवली व रस्त्यांना मोकळा श्‍वास मिळवून दिला. यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सुद्धा या कामाची दखल घेत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. 

मात्र, काही सत्ताधारी नगरसेवक (एकांतात) व विरोधी पक्षांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी फलटण नगरपरिषदेवर एक मोठा आरोप केला की, गरिबांची अतिक्रमणे काढली मात्र मोठ्यांची अतिक्रमणे काढली नाहीत.

दरम्यान, सध्या जुना पृथ्वी चौक व नवीन नामकरण झालेल्या अहिल्यादेवी होळकर चौकातील एका सोनेचांदी विकणार्‍या व्यापार्‍याने आपल्या इमारतीचा काही भाग अतिक्रमणात बांधला असल्याची चर्चा सुरू असून, प्रत्यक्ष तेथे गेल्यावर एसटी स्टॅण्ड कडून किंवा डी. एड. चौकातून येताना चौकाच्या मधोमध अतिक्रमण केलेली इमारत स्पष्टपणे दिसत आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाचे काही अधिकारी सांगत आहेत की, संपूर्ण रिंगरोडवरतीच बर्‍याच लोकांनी अतिक्रमण केले आहे. तर एका अधिकार्‍याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, कजप पत्रक (कमी जास्त पत्रक) न केल्याने ही इमारत उभी केली आहे.

दरम्यान, अनेक गोरगरिबांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता धडाधड बुलडोझर लावून अतिक्रमणे काढीत त्यांच्या अन्नात माती कालवली, मग हा व्यापारी रिंगरोडमध्ये इमारत बांधतो व मुख्य चौकात अतिक्रमण करतो, तो कोणाच्या राजकीय वरदहस्ताने, अशी चर्चा सुरू असून या इमारतीवर बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशी मागणी फलटणकर नागरिकांमधून होत आहे.


अतिक्रमाणामुळे होतायेत अपघात
आत्तापर्यंत रिंगरोडवर छोटे-मोठे अपघात होऊन तब्बल 30/35 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जायबंदी झाले आहेत. दरम्यान, या इमारतीच्या उंची व रुंदीमुळे अनेक लोक वाहन चालवताना फसत असून, पुढे मोठा अपघात घडला तर या अपघातास या इमारत मालकाला जबाबदार धरले जावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER