Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पासाठी सामंजस्य करार अंतिम टप्प्यात

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटनवाढीला चालना मिळणार
टीम : धैर्य टाईम्स
कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय करार होणार पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४

मुंबई : जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय सामंजस्य करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढीला चालना देणारा अभिनव प्रकल्प  प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबंधित विभागांची बैठक घेऊन सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने निर्देश दिले.

कोयना धरणापासून उत्तरेस सुमारे ४० कि.मी. अंतरावर शिवसागर जलाशयाच्या तीरावर मौजे मुनावळे (ता. जावळी) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जागतिक दर्जाचा नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये जागेची पाहणी करून सदर प्रकल्पाबाबत सूचना दिल्या होत्या. या प्रकल्पाकरिता महसूल आणि जलसंपदा विभागाकडे असणारी जमीन हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर प्रकल्पाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रकल्पाकरिता सामंजस्य करार पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. त्यानुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी मंत्रालयात कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याबाबत निर्देश दिले. या बैठकीस पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

सदर कराराच्या मसुद्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली असून लवकरच सामंजस्य करार होऊन मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रकल्पास ४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामुळे पर्यटन वाढ होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यात पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचा समावेश असलेला आणि नदी जलाशयावर होणारा अशाप्रकारचा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कायम आग्रही आहेत. त्या दृष्टीने येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सामंजस्य करार पूर्ण करून लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER