अनेक वर्षे प्रलंबित असलेली व महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भागाला तारणहार ठरलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना सध्या रखडलेली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादच्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला खो बसला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आजचा हवाई दौरा निश्चितच विशेष महत्वाचा ठरणार आहे
निरा देवघर सिंचन प्रकल्प व माढा लोकसभा मतदारसंघाची हवाई पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली असून रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आजचा हवाई दौऱ्याला विशेष महत्व आहे.
केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आज सकाळ पासून पुण्यातून हेलिकॉप्टरने येत आहेत. हेलिकॉप्टर मधूनच ते फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्याची पाहणी करणार आहेत.
निरा देवघर सिंचन प्रकल्पाला नुकतीच सुमारे ३९०० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेषतः फलटण व माळशिरस तालुक्याला याचा फायदा होणार आहे.
सोबतच अनेक वर्षे प्रलंबित असलेली व महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भागाला तारणहार ठरलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना सध्या रखडलेली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादच्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला खो बसला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा हवाई पाहणी दौरा विशेष महत्वचा ठरणार आहे.