फलटण प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघातील महायुती तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे भाजपचे असल्याचे सूचक विधान माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बारस्कर यांनी केले, ते माढा लोकसभा मतदार संघातील प्रचार दौऱ्यात फलटण येथे असताना धैर्य टाईम्सच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
यावेळी बोलताना पुढे रमेश बारस्कर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. या सभांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणार असल्याचे बारस्कर म्हणाले. तर त्याचबरोबर या मतदारसंघांमध्ये युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याही सभेचे आयोजन करणार असल्याची माहिती रमेश बारस्कर यांनी दिली. महायुती व महाविकास आघाडी मधील समोर दोन उमेदवार असले तरी दोन्ही उमेदवार भाजप पक्षामधील असल्याने मतदारांनी आपल्या सोबत येत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी रमेश बारस्कर यांनी केले.