मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.८५ रुपयावर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.६६ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११०.४९ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.८३ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.९३ रुपये इतके आहे.
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर गेलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करून केंद्र सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिले आहे. आज सायंकाळी केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली. यात पेट्रलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कपात करण्यात आली आहे. उद्या गुरुवारपासून ही शुल्क कपात लागू होईल.
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.८५ रुपयावर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.६६ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११०.४९ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.८३ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.९३ रुपये इतके आहे.
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०६.६२ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ९८.४२ रुपये इतके आहे. चेन्नईत १०२.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १०१.५६ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.९० रुपये असून बंगळुरात डिझेल १०४.५० रुपये आहे.