शौचालय असेल तर निवडणूक लढवण्याचा कायदा आला त्यानंतर दोन अपत्य असतील तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला आता घरापुढे झाडे असतील तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे झाडे लावली तर तिकिटे दिली पाहिजेत असे स्पष्ट मत रामराजे यांनी व्यक्त केले.
फलटण ; आज सर्व देशांपुढे जागतिक तापमान वाढीचे संकट ओढवले आहे, झाडे लावून निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे असून वृक्षारोपणाची चळवळ उभी करत फलटण पॅटर्न करून दाखवणार असल्याचा आत्मविश्वास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला, ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाईक-निंबाळकर देवस्थाने व इतर चारीटेबल ट्रस्ट फलटण यांच्यावतीने एरीकेशन कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी बोलत होते . यावेळी आमदार दीपक चव्हाण , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर तहसीलदार समीर यादव उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे उपवनसंरक्षक महादेव मोहिते प्राध्यापक सुधीर इंगळे वनविभागाचे अधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, शौचालय असेल तर निवडणूक लढवण्याचा कायदा आला त्यानंतर दोन अपत्य असतील तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला आता घरापुढे झाडे असतील तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे झाडे लावली तर तिकिटे दिली पाहिजेत असे स्पष्ट मत रामराजे यांनी व्यक्त केले.
शासनाने वनविभागाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असले तरी हे उद्दिष्ट आपण सर्वांनी एकत्र येऊन साध्या केले पाहिजे. फलटण ला हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या संस्था व इतरांना बरोबर घेऊन वृक्षारोपण ची चळवळ उभी करण्याचा पुनरुच्चार ना. रामराजे यांनी व्यक्त यावेळी केला.