फलटण प्रतिनिधी:- फलटण शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी शहर पोलिसानी धाड टाकत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (E) प्रमाणे ताडी व हातभट्टीची दारू विकताना दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली सविस्तर हकीकत अशी की, पहिल्या घटनेत रविवार पेठ, मच्छी मार्केट फलटण याठिकाणी प्रतिक रामचंद्र अवघडे (राहणार दहिवडी एसटी स्टँड,जवळ तालुका माण जिल्हा सातारा) हा ताडी विकताना आढळून आला. सदरची कारवाई पोलीस नाईक नितीन प्रल्हाद भोसले यांनी केली या कारवाईत 10 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर दुसऱ्या घटनेत दत्तनगर फलटण येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला सुनील किसन गुंजाळ (राहणार. दत्तनगर फलटण) हा कॅनमधून हातभट्टी दारू विकताना आढळून आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस हवालदार अंकुश आनंदराव गार्डी यांनी केली.