फलटण | धैर्य टाईम्स | 12 मार्च 2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने येथील जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड फलटणचे संचालक सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी यावर्षी फलटण शहरातील जयंती महोत्सव समितीस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या पुस्तकाच्या दोन संचाची भेट दिली आहे.
डॉ. प्रसाद जोशी हे नेहमीच फलटणकरांच्या आरोग्यासाठी झटत असतात. गेली अनेक वर्ष नागरिकांसाठी ते फलटणमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करतात ज्या माध्यमातून आरोग्य जपण्याचा संदेश देत असतात. हजारो तरुण-तरुणी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मॅरेथॉन उपक्रमामध्ये भाग घेत असतात. तर वेळोवेळी त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंट वरून आरोग्य विषयक वेगवेगळे लेख लिहून आरोग्याबाबत जागृतीच करण्याचं काम करत असतात. त्यांचे अनेक विषयावरील लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळत असतात. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच, संगीत व सामाजिक क्षेत्रातही डॉ. जोशी हे कार्यरत असतात. डॉ. प्रसाद जोशी यांनी यावर्षी आपलं वेगळेपण जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती फलटण शहर यांना भेट दिलेल्या पुस्तकाच्या संचाचा फलटणमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. आगामी काळात या पुस्तकांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात चांगल्या प्रकारे उपयोग होऊन अधिकारी घडवण्यामध्ये उपयोग होणार आहे.
डॉ. प्रसाद जोशी यांच्याकडून पुस्तकांचा संच स्वीकारताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती 2025 चे गणेश भि.अहिवळे,अजय का.काकडे, गोविंद प्र.काकडे,सुरज वी.काकडे, भूषण बनसोडे, सिद्धार्थ र. अहिवळे, चंद्रकांत म.मोहिते, मंगेश प.सावंत, कपिल नं. काकडे. आदी मान्यवर उपस्थित होते.