Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी -पालकमंत्री शंभुराज देसाई

टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि. 20  : हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना अन्न, शुध्द पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस व देण्यात आलेला इशारा या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभुराज देसाई  यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला, यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसलिदार, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य अधिकारी आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला.

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत, काही ठिकाणी रस्ते खचत आहेत, पूल वाहून जात आहेत, दरडी कोसळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ज्या संवेदनशील ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा ठिकाणी मंगलकार्यालये, मोठी सभागृहे, शाळा, आदी सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करावे. त्यांना निवारा अन्न, शुध्द पेयजल, अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद द्यावा, संवेदनशील भागात पोलीसांची गस्त वाढवावी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पथके तयार करावीत. या पथकांनी संवेदनशील ठिकाणी भेटी द्याव्यात. दरड कोसळण्याची ठिकाणे असणाऱ्या भागात यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

            जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, दरडी कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या 41 गावांतील लोकांचे त्वरीत स्थलांतर करावे, त्यांना अन्न, शुध्द पेयजल, औषधे, आदी आवश्यक सुविधा, उपलब्ध करुन द्याव्यात. स्थलांतरीत ठिकाणी आवश्यकतेनुसार जनावरांच्या चाऱ्याची तजवीज ठेवावी. स्थलांतरीतांपैकी कोणीही रात्री घरी जावू नये याची बचाव यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. अन्नाची पाकीटे, कोरडे खाद्यपदार्थ उपलब्ध ठेवावेत. वैद्यकीय पथकांनी लोकांना स्वत: जावून भेटी द्याव्यात व भेटीचा अहवाल सादर करावा. आरोग्य यंत्रणेने जलजन्य आजार,   सर्पदंश यावरील आवश्यक पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध ठेवावा. वादळवारे, पाऊस यासारख्या कारणांनी विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल तेथील विद्युत प्रवाह विद्युत विभागाने लवकर सुरू करावा. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे. आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरुन न जाता मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

            नियंत्रण कक्ष

· मान्सून कालावधीत सर्व संबंधित विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष 24 x 7 या तत्वावर कार्यान्वित आहे.

फोन नं -02162-232349/232175.

· तसेच जिल्हयातील पोलीस विभाग- फोन नं.02162-233833/231181 मो.नं.-9011181888, पाटबंधारे विभाग फोन नं -02162-244681/244654/244481, सार्वजनिक बांधकाम विभाग फोन नं-02162-234989, आरोग्य विभाग फोन नं- 02162-233025/238494, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मो.नं-9029168554 इत्यादी विभागांनी त्यांचे स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केलेले आहेत.

· मान्सून कालावधीत धरण क्षेत्रात होणारे पर्जन्यमान, धरणातील साठा, आणि पाण्याचा विसर्ग तसेच नदीपातळी इ. अदयावत माहिती ऑनलाईन प्राप्त करुन घेणेसाठी शासनाचे वेबसाईट

1. www.Punefloodcontrol.com 2. http://210.212.172.117/rtdas

जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन

· अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे/भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावातील नागरिकांनी  अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क रहावे. धोकादायक स्थतीत अथवा मोडकळीस आलेल्या घरात राहू नये. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.

 · धोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास टाळावा. कडा कोसळणे/दरडी कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नये.

· अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो, ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी पूराच्या पाण्यात /ओढयातून प्रवास टाळावा. तसेच नदी, ओढ्यानाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये.

· जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

· पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करु नये. त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.

· नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये.

·अतिवृष्टीच्या कालावधीत तात्काळ सुरक्षित जागेत (नातेवाईक,समाजमंदिर,शाळा इ.ठिकाणी)

स्वत: हून स्थलांतरित व्हावे.

· मान्सून कालावधीत साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी शक्यतो पाणी उकळून गार करुन प्यावे.

· विजा कडकडत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. (पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.)

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER