फलटण : येथे गेली २७ वर्ष बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देणारे यश कंट्रक्शनच्या ऑफिसचा रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत नवीन जागी स्थलांतर समारंभ संपन्न होत आहे.
ग्राहकांची भक्ती हे सूत्र स्वीकारून त्यांची उपेक्षा न करता त्यांच्या अपेक्षा जर पूर्ण केल्या, तर ग्राहक देव प्रसन्न होतो, हा राजीव नाईक निंबाळकर यांचा अनुभव खूपच बोलका आहे. त्यांच्या मते अस्सलकृती आणि व्यवहार वाद म्हणजे धाडस कष्टावरील निष्ठा व कुठल्याही परिस्थितीत तोंड देण्याची क्षमता एवढ्या भावबळावर यश कंट्रक्शन ने फलटणच्या बांधकाम व्यवसायात आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
गेल्या २७ वर्षाचा बांधकाम क्षेत्रात फलटण येथे डॉ.सोनवणे यांचे चिरजीवन हॉस्पिटल, महाराजा मंगल कार्यालय, सजाई मंगल कार्यालय अशा फलटणच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या इमारती सह "यश" या नावाने १४ अपार्टमेंट्स बरोबरच अनेक उत्तुंग व दर्जेदार बांधकामे पूर्ण केली आहेत.
ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच बांधकाम क्षेत्रातील नवनवीन संकल्पना फलटण येथे रुजवण्याचे श्रेय कंट्रक्शनला जाते.
रविवार दि.१८ डिसेंबर २०२२ ला सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत यश कन्ट्रक्शनच्या ऑफिसचा स्थलांतर मोनिता पॅराडाईज, ऑफिस ९ पहिला मजला,लक्ष्मी नगर, फलटण (सातारा ) येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजीव नाईक निंबाळकर यांनी केले आहे.