फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील सुरवडी, बिबी,आदर्की बु., आळजापूर, कापशी, हिंगणगाव, टाकूबाईचीवाडी, सासवड आदी ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाट्न समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 - 30 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा. सभापती विधान परिषद महाराष्ट्र, आमदार फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघ - दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती फलटण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार असल्याची माहिती धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, मा.जिल्हा परिषदेचे मा. सदस्य व मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य, सातारा यांनी दिली.
दुपारी 1 : 30 वाजता सुरवडी, 2:30 वाजता बिबी, 3:30 आदर्की, 4:30 वाजता आळजापूर (सभा ), 5:30 वाजता कापशी, 6 वाजता हिंगणगाव, सायंकाळी 7 वाजता सासवड, कार्यकर्ता मेळावा असा भरगच्च कार्यकम होणार आहे. यावेळी खालील विविध विकासकामांचे उदघाट्न व भूमिपूजन होणार आहेत.
आळजापूर वितरिका नं. ३७ ,२१ कोटी, आदर्की बु।। वितरिका नं. ३३, ४ कोटी, हिंगणगाव एम.एस.ई.बी. सबस्टेशन ३ कोटी ७९ लक्ष, मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन / ३ बंधारे १ कोटी ४० लक्ष, सासवड ते बडेखान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे ४ कोटी ५० लक्ष, सासवड ते घाडगेवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी, सासवड ते रासकर वस्ती रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी, सासवड ते शिवेचा मळा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी ५० लक्ष, सासवड हिंगणगाव रस्त्यावरील ओढा बॉक्स पूल २ कोटी, म्हस्कोबा मंदिरासमोरील बॉक्स पूल उद्घाटन १ कोटी, संत तुकाराम मंदिर सभामंडप टाकोबाईचीवाडी उद्घाटन २० लक्ष, झणझणे आळी रस्ता काँक्रीटीकरण करणे ९ लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधणे३० लक्ष, स्व. जगन्नाथ भिकू भुजबळ (दादा) प्रवेशद्वार माळीबंद, सासवड ( भूमिपूजन ) तर प्रस्तावित विकास कामे म्हस्कोबा मंदिर सुशोभीकरण करणे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झणझणे आळी ते नलवडे बंद रस्ता करणे.