फलटण :
वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्षपदी फलटण येथील सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
सातारा जिल्हा पूर्व विभाग अध्यक्ष भीमराव घोरपडे, पूर्व विभाग महासचिव अरविंद आढाव व फलटण तालुका अध्यक्ष संदीपभाऊ काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुभाषराव गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व विभाग उपजिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी अशोकराव भोसले, सुनी तुपे, खंडाळा तालुका अध्यक्ष खुंटे, दहिवडी तालुकाध्यक्ष युवराज भोसले, सातारा जिल्हा पूर्व विभाग महिला अध्यक्षा सौ.चित्रा गायकवाड, फलटण महिला आघाडी अध्यक्षा सौ. अश्विनी अहिवळे, सातारा जिल्हा संघटक रणजीत मोहिते, विजय कांबळे सूर्यकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.