Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

एक वेळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी तडजोड करेल मात्र शिवरुपराजे खर्डेकर यांच्याशी नाही – आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी : फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावात त्यांची पावलोपावली अडचण होत होती म्हणून आपल्याला लोकसभेला वेगळा निर्णय घ्यावा लागला.अशा माणसाला शिवरूपराजे खर्डेकर यांनी साथ देणे बुध्दीला पटत नाही.शिवरूपराजे यांना आम्ही घरातले समजून सर्व काही दिलं मात्र त्यांनी आम्हाला परकं मानलं आहे.अडचणीच्या काळात जे गटासोबत राहिले आहेत,त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.तालुक्याचं भलं करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो होतो कामातून आणि विकासातून माणसं जोडण्याचे काम गेली तीस वर्षे करत आहोत. एक वेळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी तडजोड करेल मात्र शिवरुपराजे खर्डेकर यांच्याशी नाही असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

आसू (ता. फलटण) येथील विविधवि कासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनस मारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचेपंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर,श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, संचालक स्वामीनाथ साबळे,राजन फराटे,महादेव आबा पवार,विकासकाका वरे,अशोक तावरे,प्रमोद झांबरे,विश्वासदादा गावडे, दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, जयकुमार इंगळे यांच्यासह आसू पंचक्रोशीतील राजे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

फलटण तालुक्याच्या कोणत्या अडचणीत शिवरूपराजे उभे राहिले आहेत,ते त्यांनी सांगावे.आम्ही पूर्वभागाची माफी मागितली पाहिजे,कारण ह्या अशा माणसाच्या मागे आम्ही तुम्हा जनतेला उभे राहायला सांगितले होते.यापुढे शिवरूपराजे यांचे बरोबर तडजोड करणार नाही.त्यांचे आमचे संबंध संपलेले आहे.आमचा भाजपा किंवा अजितदादा पवार यांना विरोध नाही. जे काही घडले आहे,ते मी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितले होते की, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्टेजवर आम्ही जाऊ शकत नाही. मी जर महायुती सोबत गेलो असतो तर मला सभापतीपद मिळाले असते. मात्र मी कार्यकर्त्यांचा विचार केला ज्यांनी कार्यकर्त्यांना अडचणीत आणले त्या माजी खासदाराला साथ देणे मला पटले नाही.शिवरूपराजे यांना जी पदे दिली होती ती अजित पवारांनी सांगितली होती का? तुम्ही अजितदादांच्या सोबत एकनिष्ठेची शपथ घेताय, हेच हास्यास्पद आहे.तुमचं पाणी सांगोल्याला नेलं तेव्हा शिवरूपराजे कुठं होते? असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, आ. श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. दुष्काळी भागाला पाणी द्यायचे काम रामराजे यांनी केले आहे. यासोबतच बागायती पट्ट्यामध्ये मूलभूत सुविधा देण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. रामराजे यांच्या माध्यमातून ‘कमिन्स’ सारखी मोठी कंपनी झाली आहे. नीरा-देवघर प्रकल्प हा रामराजे यांच्या काळातच झाला आहे. पाडेगाव ते आसूपर्यंतच्या ३६ गावांना पाणी देण्याचे काम रामराजे व संजीवराजे यांनी केले आहे.

यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, आसू ग्रामस्थांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहे. आज अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत. रामराजेंच्या कारकिर्दीत आसूमध्ये असा कार्यक्रम प्रथमच झाला आहे. लोकसभेला कार्यकर्ता मेळाव्यात ९९.९९% लोकांनी निर्णय काय घ्यायचा हे सांगितले होते. वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकत्रित आहे परंतु तालुक्याच्या राजकारणात पावलोपावली माजी खासदार यांची अडचण होत होती.आपण लोकसभेला निर्णय घेतला, तो जर घेतला नसता तर रामराजे यांचे राजकारण अडचणीत आले असते. आम्ही शिवरूपराजे यांना कधीही वेगळे मानले नाही.अगदी बाजार समिती सभापतीपद,पंचायत समिती सभापतीपद,उप सभापतीपद व जिल्हा बँकेचे संचालक ही सर्व पदे दिली. तरीही शिवरूपराजे यांनी विरोधात काम केले. अडचणीच्या काळात जे राजे गटासोबत राहिले, त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER