फलटण ( प्रतिनिधी)
जाधववाडी (फलटण ) मध्ये कोणतीही कोणतीही गडबड झालेली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे ते धैर्य टाईम्सशी बोलत होते.
जाधववाडी (फलटण ) मध्ये दहशतवादी विरोधी पथकाकडून कारवाई झाल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाल्यानंतर जाधववाडी सह फलटण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती, या पार्श्वभूमीवर धैर्य टाईम्सने पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या अफवा विषयी माहिती घेतली. यावेळी पुढे बोलताना तानाजी बरडे म्हणाले की, जाधववाडी परिसरामध्ये अशी कोणतीही घटना घडली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला असला तरीही, जाधववाडी सह फलटणमध्ये आजही दबक्या आवाजात चर्चा सुरू असून जाधववाडीत आलेली लोकं नेमकी कोण होती अशी चर्चा आजही सुरु असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.


















