फलटण प्रतिनिधी -
महावितरणकडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज मंगळवार (दि. 05 मे 2026) रोजी HT लाईन व DTC मेंटेनन्सच्या कामासाठी 22KV फलटण येथील मुन्सिपल वाहिनीवरील वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे. यामध्ये MSEB ऑफिस परिसर, जलमंदिर, लक्ष्मी नगर, रामराजे शॉपिंग सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डेक्कन चौक, पवार गल्ली, नारळी बाग, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कॉलनी, शंकर मार्केट, दगडी पूल, टेलिफोन एक्सचेंज तसेच MRBC कॉलनी या भागांचा समावेश आहे.
महावितरणने नागरिकांना याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मेंटेनन्सचे काम नियोजित वेळेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.










