फलटण प्रतिनिधी - केंद्र सरकाच्या वतीने उत्कृष्ठ प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक कोल्हापुर परीक्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (भा.पो.से.) यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. सजाई गार्डन फलटण येथे नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी समीर शेख (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, सातारा मा.डॉ. वैशाली कडूकर (म.पो.से.), अपर पोलीस अधिकारी, सातारा यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग यांनी नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.