फलटण प्रतिनिधी:- भरधाव वेगात दुचाकी गाडीलाधडक देऊन अपघात केल्या प्रकरणी एका चालकाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक फलटण येथील सराफ यांचे दुकानाचे समोरून फिर्यादी दिनेश रामचंद्र वाडकर (रा. शुक्रवार पेठ ता. फलटण) हे त्यांच्या टीव्हीएस एक्सल गाडी नंबर एमएच १२ आर बी 8729 वरून घरी जात असताना चारचाकी गाडी मधील चालक अमोल मारुती महागडे (रा. गोळीबार मैदान संजीवराजे नगर फलटण) याने त्याचे ताब्यातील गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जात असताना गाडीचे उजवे हँडलला जोराचा धक्का देऊन अपघात केला. अपघातात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत करून गाडीचे नुकसान केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सोनवलकर करत आहेत.