फलटण प्रतिनिधी:- मोकाट कुत्री, स्वच्छता, साफसफाई, घाणीचे साम्राज्य अशा अनेक समस्याबाबत राष्ट्रीय काँग्रेस फलटण च्या वतीने फलटण नगरपरिषदेस निवेदन देऊन सर्व मागणी करण्यात आलेल्या समस्येबाबत तातडीने उपाय योजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फलटण शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे तसेच काही ठिकाणी स्वच्छता, साफसफाई ची कामे वेळेवर झाली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यात मच्छर वाढले आहेत त्यामुळे आजारपणात वाढ झाली आहे त्यासाठी स्वच्छता अभियान चालू करून फवारणी करावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस फलटण च्या वतीने नगरपरिषद च्या उपमुख्याधिकारी श्रीमती वर्षा बडदरे तसेच कार्यालय अधिक्षक मुस्ताक महात यांना निवेदन देऊन सर्व मागणी करण्यात आलेल्या समस्येबाबत तातडीने उपाय योजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन देतांना फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी (बेडके), शहर काँग्रेस चे अध्यक्ष पंकज पवार,तालुका कार्याध्यक्ष अमिरभाई शेख,जिल्हा अनूसुचित जाती सेलचे उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष ताजुद्दिन बागवान,शहर अध्यक्ष अल्ताफभाई पठाण उपस्थित होते.