पंतप्रधान आवास योजनेतील अपात्र लाभार्थी रुपाली शैलेंद्र सूर्यवंशी यांना घरकुल योजनेचे पेमेंट अदा करीत रस्त्यावरील अतिक्रमण जागेतील आदीच्या राहत्या आरसीसी बांधकाम असलेल्या घराच्या मजल्यावर नियमाचे उल्लंघन करीत मंजुरी
कापडगाव ( ता . फलटण , जि . सातारा) येथील शासकीय जागेत अतिक्रमण केल्याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोणतीही कारवाई होत नसल्याने तक्रारदार राहुल रुपनवर यांनी फलटण पंचायत कार्यालया समोर आज दिनांक ७ जून पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. याविषयी निवेदन देण्यात आले आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील अपात्र लाभार्थी रूपाली शैलेंद्र सुर्यवंशी यांना घरकूल योजनेचे पेमेंट अदा करीत सदर घरकुल हे त्या लाभार्थीच्या शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम केलेल्या आधीच्या राहत्या आरसीसी घराच्या छतावर घरकुलास शासकीय नियमांचे उल्लंघन करून मंजूरी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी फलटण पंचायत कार्यालयास नियमानुसार उचित कार्यवाही करणेचे लेखी आदेश देऊनसुध्दा त्या पत्रानुसार कोणतीही कार्यवाही न करता पंतप्रधान आवास योजनेतील अपात्र लाभार्थी रूपाली शैलेंद्र सुर्यवंशी यांना पाठीशी घालत असून सदर घरकूल योजनेथचे पेमेंट अदा करीत असल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.