छत्रपती शिवाजी महाराज, संतसेना महाराज यांनी नाभिक समाजाला मानाचे स्थान दिले होते हा विसर आ.रामराजे यांना पडलेला दिसत असल्याचे बाळासाहेब काशीद यांनी सांगतानाच नाभिक समाजाचे वतीने आपण आ.रामराजे नाईक निंबाळकर यांचा जाहीर निषेध करत असल्याचे बाळासाहेब काशीद यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा पालकमंत्री, कृष्णा खोरे उपाध्यक्ष, मुंबईचे पालकमंत्री यासह राजकीय कारकीर्दीमध्ये मोठी पदे भूषवली आहेत सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या तीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीला नाभिक समाजाने मोठे योगदान दिले असल्याचे फलटण तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी बोलतानाच (वाठार निंबाळकर) फलटण येथे काल झालेल्या शेतकरी मेळाव्यात आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाभिक समाजा विषयी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला ते धैर्य टाईम्सशी बोलत होते.
पुढे बोलताना पै.बाळासाहेब काशीद म्हणाले की, आमदार रामराजे यांच्या कारकिर्दीला नाभिक समाजाने दिलेल्या योगदान पाहता नाभिक समाजाविषयी काल झालेल्या सभेमध्ये हात वारे करत केलेले वक्तव्याची समाजाकडून अपेक्षा नव्हती, त्यांच्या हातवारे व वक्तव्यावरून रामराजे नाभिक समाजाला तुच्छ समजतात असे स्पष्ट दिसते आहे, आमचा समाज व व्यवसायाला तुच्छ समजणारे रामराजे यांनी आमच्यासाठी वेगळा व्यवसायाची तरतूद करावी अशी खोचक प्रतिक्रिया बाळासाहेब काशीद यांनी दिली.
वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज, संतसेना महाराज यांनी नाभिक समाजाला मानाचे स्थान दिले होते हा विसर रामराजे यांना पडलेला दिसत असल्याचे बाळासाहेब काशीद यांनी सांगतानाच नाभिक समाजाचे वतीने आपण रामराजे नाईक निंबाळकर यांचा जाहीर निषेध करत असल्याचे पै.बाळासाहेब काशीद यांनी सांगितले.