फलटण प्रतिनिधी -
कोळकी जिल्हा परिषद गटातील वाड्या-वस्त्यांवर लाईटची व्यवस्था व्हावी यासाठी आमदार सचिन पाटील, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड.जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सौर दिवे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
तसेच डोंगरी विकास योजनेतून दालवडी येथे बंदिस्त गटर योजनेसाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भाडळी खुर्द येथेही बंदिस्त गटर योजनेसाठी २.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार निधीतून गोळेगाव, ठाकुरकी आणि झिरपवाडी येथे रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच गिरवी जाधववाडा येथे ७ लाख रुपये खर्चून सभामंडप उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सौर दिव्यांचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे : कोळकी – २ नग, गिरवी – ३, धुमाळवाडी – २, बोडकेवाडी – २, भाडळी खुर्द – २, भाडळी बु. – २, सोनवडी बु. – २, कुरवली – २, जाधववाडी – २, झिरपवाडी – २, ठाकुरकी – २, चावडी – २, दालवडी – २, निरगुडी – २, मांडवखडक – २, विचुरणी – २, सासकल – २ असे एकूण ३५ सौर दिवे मंजूर करण्यात आले आहेत.
या सर्व कामांमुळे कोळकी जिल्हा परिषद गटातील ग्रामीण भागाचा विकास होण्यास चालना मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.










