लोकप्रिय रियलिटी शो बिग बॉस मराठी 5 चा (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला आहे. सुरज चव्हाण, अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) , निकी तांबोळी ( Niki Tamboli ) हे तीन स्पर्धक बिग बॉसचे टॉप 3 स्पर्धक ठरले होते.
मात्र सुरज चव्हाणने अभिजीत सावंत आणि निकी तांबोळीला मात देत बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनला आहे.
बिग बॉस मराठी 5 च्या पहिल्या दिवसापासून सूरज चव्हाणला चाहत्यांकडून फूल सपोर्ट मिळत होता. सूरज देखील आपल्या वेगळ्या स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकत होता. जेव्हा बिग बॉसने सूरज आणि अभिजीतला घराचे दिवे बंद करून तसेच आपल्या नावांच्या पाट्या घेऊन या घराचा निरोप घ्यावा असं आदेश दिले तेव्हा सूरज प्रचंड भावुक झाला होता.
तर दुसरीकडे ट्रॉफी न घेता जान्हवीने खेळातून एक्झिट घेत 9 लाख रुपये कमवले. यावेळी जान्हवी भावुक होत म्हणाली, "मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते.











