Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

सैनिकांचा सन्मान करणारा देश सर्व अर्थाने महान होतो - ॲड. नरसिंह निकम

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : दि. 11 ऑगस्ट 

जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मातृ पितृ ऋण, समाज ऋण आणि राष्ट्रऋण अशा तीन ऋणामध्ये जन्म घेत असते. जन्मानंतर संपूर्ण आयुष्यभर या तीन घटकांची सेवा करून आपण ऋणातून उतराई होऊ शकतो परंतु ही संधी सर्वांना मिळत नाही. आपल्या मातृभूमीची सेवा करणाऱ्या सैनिकांना ही संधी प्राप्त होते व त्यांनाच खऱ्या अर्थाने मोक्ष किंवा स्वर्ग प्राप्त होतो व अशा सैनिकांचा सन्मान करणारा देश सर्व अर्थाने महान होतो असे उद्गार फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत माजी खासदार लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन येथे आयोजित केलेल्या माजी सैनिकांच्या सत्कार समारंभात अ‍ॅड. नरसिंह निकम बोलत होते. यावेळी फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक महादेव उर्फ बाळासाहेब भोसले, फलटण तालुका वारकरी संघटनेचे सचिव हभप केशव महाराज जाधव, भाजपाच्या फलटण कोरेगाव मतदार संघाचे संपर्कप्रमुख सचिन कांबळे पाटील, भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव प्रा. सतीश जंगम, राजेंद्र नागटिळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 माजी सैनिक सुरेश जाधव, निवृत्ती गरड, बापू अण्णा सस्ते, प्रकाश संपतराव रणवरे, किरण नारायण फाळके, अरुण गायकवाड, रामदास सावंत, मारुतराव शिंदे, चंद्रकांत अडसूळ, अनिल निकम, तुकाराम गुलदगड माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

नऊ ऑगस्ट संपूर्ण देशभर ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जात असून याच दिवशी आपल्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी मिट्टी मेरा देश अभियान घोषित केले असून या अभियानांतर्गत अनेक ठिकाणी माजी सैनिकांचा सन्मान होत आहे. आज-काल देशभक्ती कुठेतरी कमी होत असल्याची खंत व्यक्त करून देशातील तरुण पिढी आणि नागरिकांच्या मध्ये ही देशभक्ती निर्माण करणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी सांगून देशाच्या सीमारेषेवर सैनिक संरक्षणाचे काम करीत असल्यामुळे देशवासीय आनंदात जीवन जगत आहेत. म्हणून अशा सैनिकांचे स्मरण करणे त्यांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगून देशाचे सैनिक होणे ही भाग्यवान गोष्ट असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अशोकराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत आपण आपल्या मलटण प्रभागातील माजी सैनिकांचा सन्मान आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी हभप केशव महाराज जाधव, प्रा. सतीश जंगम यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मलठण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER