Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

चौथ्यांदा सुद्धा आमदार दिपक चव्हाणच उमेदवार - आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण - आतापर्यंत तीन वेळा आमदार दीपक चव्हाण हे निवडून आले आहेत चौथ्यांदा सुद्धा त्यांनाच आपण उमेदवारी देणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

खटकेवस्ती तालुका फलटण येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित् आयोजित सत्कार कार्यक्रमात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्र्वजितराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. 

फलटण तालुक्यातील जनतेने गेले तीस वर्षापासून आमच्यावर मनापासून प्रेम केले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊनच आम्ही पुढे चाललो आहे आज आमच्या कार्यकर्त्यांना ईडीची भीती दाखवली जाते मात्र आम्ही खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलो असून यापुढे कार्यकर्त्यांना धमकावणे दमदाटी करणे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात हिम्मत असेल तर दोघेही अपक्ष उमेदवार उभे करू एकदा काय व्हायचे ते होईल असे आवाहन देत आमच्या कार्यकर्त्यांना किंमत नसेल आणि त्यांना अडकवले जात असतील तर याबाबतीत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढे गाऱ्हाणे मांडू अन्यथा वेगळा निर्णय घेऊ असे 

  कार्यकर्त्यांची खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तुतारी हाती घेण्याची मोठी मागणी आहे मात्र आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या वर होत असलेल्या अन्यायाबाबत पुन्हा एकदा व्यथा मांडणार असून यातून जर सुटका होत नसेल तर कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे विचार करू अशी ग्वाही श्रीमंत रामराजे यांनी दिली.

  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमास देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा येणार होते मात्र त्यांनी येऊ नये म्हणून माण मधून त्यांना फोन गेले त्यामुळे ते येऊ शकले नाही. महायुतीत असून सुद्धा आमचे ऐकले जात नसेल व आमच्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नसेल तर महायुतीत राहायचे की नाही याचा गंभीर विचार करावा लागणार आहे.

कार्यकर्त्यांची तुतारी हाती घेण्याची मागणी जोर धरत असली तरी मी अद्याप खासदार शरदचंद्र पवार यांना भेटलेलो नाही जायचे झाले तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करूनच जाणार असून येत्या दोन ते तीन दिवसात कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करूनच काय निर्णय घ्यायचा याचा निश्चित विचार करण्यात येईल असे आमदार श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील आणि देशातील भाजप वेगळी व सातारा जिल्ह्यातील भाजप वेगळी असे चित्र सध्या उभे असून सहा आमदारांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करणारा खासदार माणच्या आमदाराच्या मागेपुढे स्वीय सहायक म्हणून मिरवतो हे दुर्दैवी आहे अशी बोचरी टीका करतानाच माजी खासदार रणजितसिंह व मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी मला पुण्यातील एका प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न केला होता . अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी असल्या प्रयत्नाला आपण भिक घालत नाही असले गलिच्छ राजकारण सध्या सातारा जिल्ह्यात चालले असून या दोघांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराही आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. 

    नीरा देवधर व धोम बलकवडीच्या पाण्यावरून माजी खासदाराकडून दिशाभूल सुरू आहे त्यांचात जर हिम्मत असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोघेही अपक्ष उमेदवार उभा करू हिम्मत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी दूध का दूध पाणी का पाणी होईल असे आव्हान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. 

 यावेळी आमदार दीपक चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदींची भाषणे झाली. याच कार्यक्रमात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याची आग्रही मागणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER