फलटण प्रतिनिधी -
कुणबी मराठा समाजाचे जे मोडी रेकॉर्ड स्कॅन करुन ज्याचे मराठी भाषांतर केले होते ते, वेबसाईट वर अपलोड केले आहे.त्या नोंदी मराठा बांधवांनी पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
फलटण तालुक्यातील मराठा कुणबी नोंदीसाठी विशेष यंत्रणा राबविण्यात आली होती. त्या संदर्भात नोंदीचे काम पूर्ण झाले आहे. फलटण तालुक्यातील एकूण 48 गावामध्ये 3456 कुणबी नोंद सापडल्या आहेत. या करीता अडीज लाखाहून अधिक मोडी कागदपत्रे तपासण्यात आली असून यामोडी लिपितील मराठी भाषांतर करुन ती माहिती वेबसाईट वर अपलोड केली असल्याची माहिती सचिन ढोले यांनी दिली.
फलटण तालुक्यातील नागरिकांनी या नोंदी तपासाव्यात व दाखल्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
https://www.satara.gov.in/en/kunbi-maratha-records/
कुणबी नोंदी पाहण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा.