Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

जोडप्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या योगेश मदनेच्या टोळीला मोक्का

पाचजणांवर कारवाई 
टीम : धैर्य टाईम्स
सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्‍या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्‍या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने रा. राजापूर, ता. खटाव, (18 गुन्हे दाखल), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर रा. चौधरवाडी, ता. फलटण, प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने रा. उपळवे, ता. फलटण, महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे रा. मोती चौक फलटण (21 गुन्हे दाखल), किरण मदने रा. राजापूर ता. खटाव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी किरण मदने याचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी, दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी एक वाजता सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र हे वीर धरण येथे फिरायला गेले होते. तेथे एके ठिकाणी गप्पा मारत उभे असताना बजाज पल्सर कंपनीच्या दोन मोटार सायकलवरुन आलेले एकुण चारजण त्यांच्या मोटार सायकली बाजूला लावून फिर्यादी व त्यांचा मित्र यांच्याकडे गेले. त्यावेळी चौघांपैकी एकाने फिर्यादी यांचा मित्र यास कुठला रे तु? इकडे काय करतोय असे विचारून थोबाडीत मारुन, फिर्यादी व त्यांचा मित्र यांना मारहाण करण्याची धमकी देवून, फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन, कानातील सोन्याचे टॉप्सचा एक जोड, मोबाईल हॅण्डसेट व फिर्यादीच्या मित्राच्या हातातील मोबाईल हॅण्डसेट जबरदस्तीने हिसकावून घेतला व मोबाईल मधील सिमकार्ड काढून तेथे फेकुन देऊन एकुण 40 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास पोनि उमेश हजारे करत होते. दरम्यान याच गुन्ह्यामधील आरोपी फलटण तालुक्यातील घाटात फलटण ग्रामीण पोलीसांना मिळून आले. चौकशीत आरोपींनी दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी वीर धरणपात्रालगत गप्पा मारत असलेल्या जोडप्यास लुटले असल्याची कबुली दिली व लुटलेला मुद्देमाल काढून दिला. त्यानुसार तपासी अधिकारी उमेश हजारे यांनी टोळी प्रमुख योगेश बाजीराव मदने व साथीदारांना गुन्ह्याचे कामी वर्ग करुन घेतले व पुढील तपास केला.

तपासात टोळीतील आरोपींनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्‍वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिल्ह्यात बारामती तालुका या पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर व इतर जोडरस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी दुकाचीस्वार व महिला प्रवासी, जोडपे यांच्यावर पाळत ठेवून वाहनांचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज दगडाने, चाकू, सत्तूर, लाकडी दांडके सारखी हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे  टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण 1999 अन्वये कारवाई करिता पोलीस अधीक्षक, सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.

मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळचे पोनि उमेश हजारे, प्रविण शिंदे, अमित सकपाळ, वैभव सुर्यवंशी, स्वप्निल दौंड, शिरवळ पो. स्टे. यांनी सहभाग घेतला आहे. 


टोळीप्रमुखाला दुसर्‍यांदा ‘मोक्का’
टोळी प्रमुख योगेश बाजीराव मदने व महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे वय 25 वर्ष यांच्यावर यापुर्वीही देखील मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती व ते नुकतेच जेलमधून सुटले होते. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER