येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाका येथील सिग्नलपासून गजानन हौसिंग सोसायटी आणि कृष्णा कॅनॉलपासून वेणूताई चव्हाण महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कराड : येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाका येथील सिग्नलपासून गजानन हौसिंग सोसायटी आणि कृष्णा कॅनॉलपासून वेणूताई चव्हाण महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, नवीन कृष्णा पुलावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची ही पहिली वेळ नसून ती नित्याची जुनीच समस्या आहे. यासाठी दुसरा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची गरज आहे.
कराड-विटा रस्त्यावरील कृष्णा नदीवर नदीवर असलेला जुना कृष्णा पूल पुरामध्ये कोसळला होता. दरम्यान, याठिकाणी नवीन कृष्णा पूल उभारण्यात आला आहे. परंतु, जुना पूल कोसळल्याने दुहेरी वाहतूक बंद झाली असून नव्या पुलावरूनच सध्या दुहेरी वाहतूक सुरु आहे. तसेच नव्या पुलालगत दुसऱ्या पुलाचे काम सुरु असून ते अंतिम टप्यात आले आहे. मात्र, तो अद्याप वाहतुकीस सुरु झाला नसल्याने या वाढत्या वाहतुकीचा ताण नवीन पुलावर पडत आहे. परिणामी याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत.
आज बुधवारी सकाळी या पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाका येथील सिग्नलपासून गजानन हौसिंग सोसायटी आणि कृष्णा कॅनॉलपासून वेणूताई चव्हाण महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ ही परिस्थिती कायम आहे.
दरम्यान, सकाळी-सकाळीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवासी, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच नुकत्याच शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना मानसिक त्रासही सहन करावा लागला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कराड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी अथक प्रयत्न करीत होते. सुमारे दोन तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.
तसेच नवीन कृष्णा पुलावर वारंवार मोठी वाहतूक कोंडी होत असून ती नित्याची जुनीच समस्या आहे. यासाठी दुसरा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची गरज असून पुलाचे उर्वरित काम तात्काळ मार्गी लावून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी प्रवासी, नागरिकांकडून होत आहे.