फलटण प्रतिनिधी : दिनांक 24 एप्रिल, धैर्य टाईम्स
पैशासाठी अपहरण करण्यात आलेल्या एकाची माहिती मिळताच 45 मिनिटात सुटका करण्याचे काम फलटण शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. फलटण शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या कामगिरीने सर्व आरोपी 45 मिनिटांमध्ये पकडलेले गेले असल्याने पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीकांत हनुमंत लुंगशे (राहणार लव्हे तालुका माढा) यांचे पोकलेन मशीन असून ते फलटण येथील कोकाटे अर्थमूव्हर्स वर्कशॉपमध्ये मशीन दुरूस्ती साठी नेले असता मशीन ऑपरेटर सचिन मोहन काटे (राहणार वाफळे रस्ता बाबर वस्ती उपळाई बुद्रुक तालुका माढा जिल्हा सोलापूर) यांने पैसे बुडवण्याच्या व पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या हेतूने मशीन मालक लुंगशे यांचे अपहरण मशीन ऑपरेटर सचिन मोहन काटे अनिल दत्तात्रय घाडगे (राहणार बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) व इतर आनोळखी चार व्यक्तींनी फलटण येथून केले होते.
अपहरण करून बारामती व जंक्शन तालुका इंदापूर येथे पैसै न दिल्यास जीव मारण्याच्या हेतूने स्कोर्पोओ गाडीने नेत असताना फलटण पोलीस निरीक्षक शंकर पाटील व त्यांची शहर पोलीस यांची टीम यांनी सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर , उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यामध्ये जंक्शन पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे सर्व आरोपींना घटनेची माहिती मिळताच 45 मिनिटात सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
यामुळे श्रीकांत लुंगशे यांचा जीव वाचवण्यासाठी फलटण पोलिसांनी जलद व योग्य ती कारवाई करून सर्व आरोपींना अटक केली व अपहरण करण्यात आलेल्या श्रीकांत हनुमंत लुंगसे यांची सुटका करण्यात आली. सदरची कारवाई केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.