Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

कृषी कायदे मागे घेऊनही आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे साताऱ्यात वक्तव्य
टीम : धैर्य टाईम्स
Action should be taken against the agitators even after repealing the agricultural laws
पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतलेले असून संसदेत त्याबाबतचे विधेयक आणून तसा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी जावे. पण तरीही आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

सातारा : पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतलेले असून संसदेत त्याबाबतचे विधेयक आणून तसा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी जावे. पण तरीही आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधानांनी हे तीन कायदे मागे घेतलेले आहेत व आता संसदेत तसे विधेयक येणार असून कायदे मागे घेण्याबाबतचा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी आपली सूचना आहे. पण आंदोलन मागे घेतले जात नाही. मात्र त्याबाबतचे विधेयक मागे घेतल्याशिवाय आम्ही मागे जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. अजुनही आमचे एमएसपी व अन्य मुद्दे आहेत अशा पध्दतीची मांडली जात असलेली भूमिका योग्य नसल्याचे सांगून आठवले म्हणाले, शेतकरी नेते राकेश टिकैत व अन्य नेते आंदोलन मागे घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
आम्हीसुध्दा नामांतरासाठी, भूमिहिनांच्या हक्कांसाठी, झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नांसाठी, दलित अत्याचारांच्या संबंधामध्ये अनेकवेळा आंदोलने केली आहेत. आम्ही अनेकवेळेला याप्रमाणे बसलो की पोलिसांनी आमच्यावर लाठीमार करून आम्हाला तिथून हलवलेले आहे. शेतकऱ्यांवर मात्र अशा प्रकारचा अन्याय झालेला नाही. आता कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरी जाणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद आठवले यांनी मांडला.
मार्च महिन्यात सरकार पडेल असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सातत्याने वाद सुरू असतात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यामुळे या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, एसटी कामगारांचा प्रश्न आहे, दलितांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे काहीतरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा
एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा. यासंदर्भात नेमलेल्या समितीने अशा पध्दतीचा निर्णय दिला, तर त्याप्रमाणे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा सल्ला आठवले यांनी यावेळी दिला. आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळावी, त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER